JUNGJAUHAR – OFFICIAL TEASER Marathi Movie| जंगजौहर, हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात …

JUNGJAUHAR OFFICIAL TEASER:

“हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात”….. ‘जंगजौहर’चा रक्तामध्ये स्फुरणंद  निर्माण करणारा टीझर प्रदर्शित झाला . 

दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर यांचा आगामी  ‘जंगजौहर’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

फर्जंद आणि फस्तेशिकस्त या दिग्पाल यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता . ऐतिहासिक चित्रपटांच्या सीरिजवर एक पाऊल पुढे टाकत त्यांनी आता पावनखिंडीचा रणसंग्राम जंगजौहर सिनेमाच्या निमित्ताने समोर आणला आहे . रक्तामध्ये स्फुरद  निर्माण करणारे दृश्य आणि डायलॉग या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत . 

JUNGJAUHAR OFFICIAL TEASER जंगजौहर Almonds Creation च्या  बँनरखाली तयार करण्यात आला आहे. अजय आरेकर  आणि अनिरुद्ध आरेकर  यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे . मृणाल कुलकर्णी , चिन्मय मांगलेकर यांच्यासह २१  कलारांची भली मोठी मांदियाळी आहे. लहानपणा पासून ऐकलेला पावनखिंडीचा पराक्रमाचा इतिहास रुपेरी पडद्यावर अनुभवणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

JUNGJAUHAR OFFICIAL TEASER Marathi Movie

पावनखिंडीचा इतिहास 

 अफझलखानाच्या वधानंतर आदिलशाही पूर्ण खिळखिळी होती , शिवाजी महाराजांनी पन्हाळयापर्यन्त मजल मारली होती .  मराठ्यांवर वचक बसवण्याकरता आणि त्यांचे पारिपत्य करण्याकरता आदिलशहा ने सिद्दी जोहरला मोठ्या फौजफाट्यासह महाराष्ट्रात पाठवले . 

त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळा किल्यावर वास्तव्याला होते , इ. स . २ मार्च १६६० सिद्दी जोहर ने पन्हाळ्याला वेढा दिला आणि महाराज किल्ल्यात अडकले . सिद्दी ने पन्हाळ्याचा वेढा पूर्णपणे कडक केला , मुसळधार पावसात सुद्धा वेढ्यात थोडीही सवलत दिली नाही . 

या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्दीस तहाचे आमंत्रण दिले त्यामुळे सिद्दी गाफील झाला .

 १३ जुलै १६६० , आषाढ शुद्ध पौर्णिमा ..पौर्णिमेची रात्र, पावसाळी ढगांमुळे प्रकाश असूनही काही दिसत नव्हते . मुसळधार  पावसाचा फायदा घेत शिवाजी महाराज  पन्हाळा किल्ल्यावरून निसटले .सिद्दी ला ह्याचा पत्ता लागला , सिद्दी च्या सैन्याने पाठलाग करून पालखी पकडली. 

 ‘शिवाजी आपल्या हातात आला’ ह्या खुशीत असलेल्या सिद्दी चा भ्रमाचा फुगा फुटला जेव्हा त्याला कळालं कि पकडलेले शिवाजी महाराज नसून शिवा काशीद आहे . शिवाजी राजे निसटले आहेत हे सिद्दी ला समजले , त्याने सिद्दीमसूद आणि फाजलखानाला राजेंच्या मागावर पाठवले ,आणि सुरु झाला पाठलाग .

पालखीचे भोई काही वेळात बदलले जात होते , पाऊस-वाऱ्याची  पर्वा न करता , दगड माती -चिखल तुडवत  ते ६०० मावळे विजेच्या वेगाने धावत होते. लक्ष एकच होते -विशाळगड , हातात नंग्या तलवारी घेऊन बाजी-फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते . मागचे पुढचे हेर सगळी खबर महाराजांप्रयंत पोहोचवत होते. क्षण आणि क्षण महत्वाचा होता . 

मराठा वीर बाजीप्रभु देशपांडे
मराठा वीर बाजीप्रभु देशपांडे

मसूदचे सैन्य घोड्यावरून पाठलाग करत होते. महाराज सैन्यासह घोडखिंडी जवळ पोहोचले , महाराज्यांनी रायाजी बांदल यांना ३०० मावळ्यांसह घोडखिंडीत मसूदला अडवण्या करता थांबवले पण त्यावेळी बाजीप्रभूंनी राजेंना सांगितले कि ‘ तुम्ही रायाजी सह विशालगढ पोहोचा गनिमांना मी घोडखिंडीच्या पुढे नाही येऊ देनार ‘. आणि गडावरून तोफा डागून पोहोल्याची खबर देण्याचे ठरले . 

बाजींनी घोडखिंडी मध्ये व्युव्हरचना केली. चढणीच्या आणि आजूबाजूच्या झाडाझुडपात गटागटाने सैनिक तैनात केले. प्रत्येकाकडे गोफणीतून फिरकवायचे दगड आणि उतरणीवरून ढकलायचे मोठे शिलाखंड जमा केले गेले. 

निर्णायक लडाई करता ३०० मावळे तयार होते , पूर्वेकडून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू यायला लागला , शत्रू समोर दिसत होता , निसरड्या वाटेने मसूदच्या सैन्याने एक वाट धरून उतरू लागले , गोफणीच्या टप्प्यात येताच बाजींनी च एकच हाकाटी दिली अचानक मसूदच्या सैन्यावर सगळीकडून दगड बरसू लागले , सैनिकांचे डोके फुटले , घोड्यांची कच खाली , काही उधळले काही सरकून पडले , मसूदचे सैन्य खाली उतरून पुढे सरकू लागले तसे पुन्हा दगड बरसू लागले. आजूबाजूच्या झाडीतून मावळे बाहेर आले त्यात बाजी आणि फुलाजी मावळ्यांसह शत्रूवर तुटून पडले , शत्रूचे सैन्यबळ जास्त होते , एक एक मावळा दहा दहा मासांना पुरून उरत होता.

बाजींच्या तलवारीच्या टप्यात  येणारा  प्रत्येक जण यमसदनी जात होता , फुलाजी पण तेवढ्याच त्वेशाने लाडात होते, पण घात झाला आणि फुलाजी पडले, त्यानंतर बाजीप्रभूंनी अजून जोमाने लढले , त्यांच्या शरीराची चाळणी झाली पण त्यांनी गनिमाला खिंडीतून पुढे नाही  जाऊ दिले .  शत्रूने ठासणीच्या बंदुकीने बाजींवर गोळी झाडली , ती बाजींच्या खांद्याला लागली , पण अजून तोफांचा आवाज आला नव्हता , बाजी तसेच लढत राहिले , तिकडे राजेंनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशाही वतनदारांच्या सैन्याचा वेढा मोडून विशाळगडावर पोहोचले , आणि किल्लेदाराला राज्यांनी तोफा डागायला सांगितल्या. 

तिकडे घोडखिंडीत तोफांचा आवाज ऐकायला आला , बाजींना खात्री झाली कि राजे गडावर सुखरूप पोहोचले त्यानंतर बाजींनी त्यांचा  देह ठेवला . 

चित्रपटाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *